ड - डलहौसीचा...( ३ )

0
0

ड - डलहौसीचा...( २ )

सकाळी साधारण अकरा च्या सुमारास आम्ही एकदाचे खजियार ला पोचलो. येथे एक भले मोठे मैदान आहे. तुलना पाचगणीच्या टेबलटॉपशी करता येईल इतके मोठे किंवा थोडे अधिकच मोठे. फरक इतकाच की पाचगणीला त्या भोवती चहुबाजुने दर्‍या आहेत, खजियारला मैदाना च्या चहुबाजुने देवदार आदी सूचिपर्णी वृक्षांचे घनदाट जंगल आहे. ("सूचिपर्णी वृक्ष" वगैरे वाचुन मराठीत शिकलेला भूगोल अनेकांना आठवेल, माझी अगदी खात्री आहे हास्य) खालच्या फोटोत जंगलाची अशी एक बाजु दिसते.

1

मैदानात छान पैकी गायी चरत होत्या.
2

आणि मैदानाच्या एका टोकाला काही हॉटेल्स आहेत ... अर्थातच माणसांना चरण्या साठी हास्य
3
यातल्या काही हॉटेल्स मधे तुम्ही मुक्कामही करु शकता.

आम्ही मात्र मैदाना च्या एका बाजुने जाणार्‍या रस्त्यावरच्या छोट्या टपर्‍यांवरनं खायला घेतले कारण आम्हाला गायींसारखे मैदानातच चरायचे होते. गरमगरम मॅगी नूडल्स ( बालहट्ट! दुसरे काय?) , अन असली घी भरपूर घातलेले आलू पराठे/गोभी पराठे/मूली पराठे! कॉलेस्टेरॉल?, ते काय असते बॉ?
4
.
.
.
.
.
.

या खालच्या फोटो कडे जरा जास्त वेळ बघा "नीट लक्ष देउन खा रे,बघ बघ, सांडशील नाहीतर गाढवा." वगैरे तुम्हाला नक्कीच ऐकु येइल.
5
वर फोटोमधे जी वाळलेली जागा आहे तिथे पाणी असते आम्ही गेलो तेव्हा अगदी थोडेसेच शिल्लक होते पण ते जेव्हा भरपूर असेल, तो तलाव ही त्यामुळे मोठा असेल तेव्हा काय सुंदर दिसत असेल अशी फक्त कल्पनाच आम्ही करु शकलो.
मैदानाभोवतीचे जंगल अगदी घनदाट आहे व मैदानाच्या कडेने पायी फिरायला पायवाट व घोड्यावरुन फिरायला फरसबंदी केलेली वाट आहे. इथे बर्फ पडल्यावर कसे मस्त दिसत असेल? असा विचार करत निवांत गप्पा मारत, रमत गमत अक्ख्या मैदानाला मग एक चक्कर मारली.

6

मग तिथे केशर विकायला एक दोन लोक आले, केशराचा वास तर छान होता पण घरी आहे आणखी काय करायचे म्हणून घेतले नाही. ते जात नाही तो हिमाचल च्या वेषात फोटो काढून घ्या म्हणत काही कॅमेरावाले आले. त्यांच्या जवळ एक ससा ही होता. त्याच्याशी खेळायला मिळाल्यामुळे चिरंजीव एकदम खुशीत आले. बाय द वे भरपूर दागिने घालायला मिळाले की बायकाही जाम खुश होतात हास्य नाही का? आमच्या बाईसाहेबांच्या चेहर्‍यावरुन आनंद कसा ओसंडून वाहतो आहे पहा.
7

हा ससा आपण घरी घेऊन जाऊया असा हट्ट ही करून झाला.
8

एव्हढ्यात एक पॅरासेलींग करणारा एक जण वर आकाशात तरंगताना दिसला
9
अन बघताबघता तो गोल फिरत फिरत खाली आला अन आमच्या जवळच मैदानात उतरला.
10
उत्साही मंडळी तिकडे धावली, पॅराशूटवाले जीप ने जवळच्या एका उंच डोंगरावर नेतात, तुमच्यासोबत एक जण पॅराशूटचे नियंत्रण करणारा बसतो अन तुम्ही १५-२० मिनीटे हवेत. रुपये३५००फक्त! ( अन मी ऐकून लगेच जमीनीवर हास्य ).

परतीच्या वाटेवर पंचकुला मार्गे जायचे असे ड्रायव्हर ने सुचवले कारण तिथे शाली वगैरे बर्‍याच स्वस्त आहेत, ते खरेच निघाले. हॉटेल मालकाने ड्रायव्हर नेइल तिथे खरेदी करु नका असा सल्ला दिला होता त्यांचे कमिशन असते इ.इ., पण ते धरुन सुद्धा इथे बरेच स्वस्त होते.कारण आधी डलहौसीला भाव माहीत करुन घेतले होते. सौ, ने काही काश्मीरी वळणाचे नक्षीकाम असलेले ड्रेस घेतले व शाली घेतल्या, खिसा बर्‍यापैकी हलका झाला. मग तिथेच बाहेर गरम गरम पकोडे व जिलेबी काढली जात होती.हास्य "खाओ बेटा, और खाओ, खाओगे नही तो ताकत कैसे आयेगी?.... " म्हणणार्‍या गोलमाल मधल्या उत्पल दत्तची आठवण न येती तरच नवल.
स्वस्त मिळणारे ड्रेस/शाली, गरम पकोडे जिलब्या काही फारशा मह्त्वाच्या नाहीत, अन्यत्र ही मिळतील. एका भारतीयासाठी पंचकुलाचे महत्व आहे ते या साठी की तिथे शहीद भगत सिगांचे काका सरदार अजीत सिंग यांची समाधी/स्मारक आहे म्हणून.
11

या काकाच्या मुळे बाल भगतसिंग ला क्रांतीकार्याचे बाळकडू मिळाले. १५ ऑगस्ट १९४७ च्या दिवशीचा स्वातंत्र्यसूर्य बघुन मगच या देशभक्त काकाने प्राण सोडला(अर्थात फाळणीचे शल्य उरी घेउनच) , जणू काही पंजाब मधला नवा बाजीप्रभूच!
12

शेतात बंदुक पेरल्यावर( हो पेरल्यावरच, पुरल्यावर नाही) बंदुकीचे झाड येइल, त्याला खूप बंदुका लागतील ज्या क्रांतीसाठी काकांना वापरता येतील असे वाटून आपल्या शेतात बंदूक पेरणार्‍या छोट्या भगतसिंग ची गोष्ट मी त्या रात्री मुलाला सांगितली.
13

क्रमशः

{मस्त लिहिताय...}

1

मस्त लिहिताय...

{वा..}

2

हा भागही उत्तम!
स्वाती

{वा ...}

3

मस्त वर्णन आणि फोटो

{खुपच सुंदर लेख व फोटो}

4

खुपच सुंदर लेख व फोटो एकापेक्षा एक सुरेख.

बाकी
सरदार अजीत सिंग यांच्या समाधीचे पुन्हा दर्शन करुन धन्य पावलो !


Hope is a good thing...

{मी मराठीचे आभार..}

5

आज शहीदांच्या पुण्यस्मरणाचा दिवस हे माझ्या आजचा भाग प्रकाशित केल्यावर स्वगृह पाहिले तेव्हा लक्षात आले. हा भाग लिहितांना नकळत का होईना आज माझ्या हातुन या देशभक्तांना स्मरणसुमने वाहिली गेली, या साठी मी मराठीचे आभार.

{खरंच मस्तय. वर्णन छान करताय.}

6

खरंच मस्तय. वर्णन छान करताय.

{झकास}

7

फोटो आणि वर्णन दोन्ही मस्तच.

>>> या खालच्या फोटो कडे जरा जास्त वेळ बघा "नीट लक्ष देउन खा रे,बघ बघ, सांडशील नाहीतर गाढवा." वगैरे तुम्हाला नक्कीच ऐकु येइल.
--- अगदी, अगदी हास्य

{मस्त आहेत फोटो. निसर्गरम्य}

8

मस्त आहेत फोटो. हास्य
निसर्गरम्य ठिकाण आहे.

{मस्त}

9

मस्त

{छान फोटोज!!}

10

>>("सूचिपर्णी वृक्ष" वगैरे वाचुन मराठीत शिकलेला भूगोल अनेकांना आठवेल, माझी अगदी खात्री आहे )

मला आठवला Big smile

बाकी लेख व फोटोज मस्तच ..

समाधीबद्दल माहित नव्हते .. Sad त्या माहिती बद्दल धन्यवाद !!

{श्रिकांतराव फारच सुरेख.}

11

श्रिकांतराव फारच सुरेख.


*~*~*~*~*~*~*~*~*~*~*~*~*~*~*~*~*~*~*~*~*~*~*~*~*~*~*~*~*~*~*~*~*~*~*
माझी खादाडी
खा रे खा

{मस्त आहेत फोटो...}

12

मस्त आहेत फोटो...


-निखिल

{मस्त}

13

मस्त

{मस्त..मस्त.....मस्त..........}

14

श्रीकांतराव,
छानच लिहिताय! गप्पा मारल्यासारखी मोकळी शैली आवडली. हास्य

>>"नीट लक्ष देउन खा रे,बघ बघ, सांडशील नाहीतर गाढवा."
Laughing out loud Laughing out loud
लेख वाचताना मीही खातच होतो. अंमळ दचकलो Big smile

बाकी, चिरंजीवांच्या हातातला ससुल्या चांगलाच तगडा दिसतोय राव हास्य नेहमीपेक्षा आकारानं थोराड आहे..हा ससा काय पठाणी आहे की पंजाबी? Big smile

शेतात बंदुक पेरल्यावर( हो पेरल्यावरच, पुरल्यावर नाही) बंदुकीचे झाड येइल, त्याला खूप बंदुका लागतील ज्या क्रांतीसाठी काकांना वापरता येतील असे वाटून आपल्या शेतात बंदूक पेरणार्‍या छोट्या भगतसिंग ची गोष्ट मी त्या रात्री मुलाला सांगितली.

व्वा! क्या बात है!!

नेमकं ह्या ना त्या कारणे, पण शहीददिनादिवशीच सरदार अजितसिंगांच्या स्मारकाचाही फोटो इथं टाकला गेला हा योगायोग छानच. हास्य

{मस्तच}

15
आणि मैदानाच्या एका टोकाला काही हॉटेल्स आहेत ... अर्थातच माणसांना चरण्या साठी

वॉव! खाद्य संस्कृतीत लई अर्थकारन मोठ हाय. मान्स लईच चरतात आमाला त्या निमित्तानी कोयना अभयारन्यात गेलेलो ते आठावल

तुम्ही १५-२० मिनीटे हवेत. रुपये३५००फक्त! ( अन मी ऐकून लगेच जमीनीव

हॅहॅहॅ ३५० रुपयात बी हवेत तरंगन्याच काम व्हतय. हास्य
श्रिकांत सायेब लिवत जावा


प्रकाश घाटपांडे
आमच्या जालनिशीत जरुर डोकवा.

{रेट डब्बल झाले काका!}

16

रेट डब्बल झाले काका!


Hope is a good thing...

{मस्त...}

17

फोटो ही मस्त

{छान फोटो, छान माहिती.}

18

छान फोटो, छान माहिती.

{झकास. बहुतौ मजा आया. "खाओ}

19

झकास. बहुतौ मजा आया.

"खाओ बेटा, और खाओ, खाओगे नही तो ताकत कैसे आयेगी?....
ताकत नही आयेगी तो पुलीस की मार कैसे सहोगे बेटा ???

हे म्हंजे एकदम परफेक्ट. गोलमाल हा जगातला सर्वोत्कृष्ठ चित्रपट आहे !!!

----

अजीत सिंगांबाबत ऐकले नव्हते. बरं झालं सांगितलेत ते.

----

मस्त सैर करवून आणलीत...


----------------------------------------------------------------------------------------
Unconditionally committed to arguing gracefully and respectfully.