पुस्तक परिचय स्पर्धा - अद्यावत (नियम व अंतिम तारीख)

'मीमराठी.नेट'(mimarathi.net) वर आंतरजालावरील हौशी लेखकांना प्रोत्साहित करण्यासाठी नवनवीन योजना राबवल्या जातात. यापूर्वी 'ललित लेखन स्पर्धा', 'लघुकथा स्पर्धा' तसेच 'कविता स्पर्धा' यांचे यशस्वी आयोजन करण्यात आले होते. या सर्व स्पर्धांना आंतरजालावरील हौशी लेखकांकडून भरघोस प्रतिसाद मिळाला होता त्याबद्दल 'मीमराठी.नेट' सर्वांचा ऋणी आहे.

या वर्षी पुण्यातील अग्रगण्य पुस्तकांचे वितरक असलेल्या 'रसिक साहित्य प्रा. लि.'च्या व 'मीमराठी'यांच्या सहयोगाने "पुस्तक परिचय स्पर्धा २०१२" आयोजित करण्यात येत आहे. वाचन संस्कृती वृद्धिंगत व्हावी, नवनवीन साहित्याचा परिचय व्हावा हा उद्देश प्रामुख्याने समोर ठेवूनच पुस्तक परिचय स्पर्धेचे आयोजन करीत आहोत.

सदर स्पर्धा सर्वांसाठी खुली आहे. स्पर्धेसाठी 'ललित लेख', 'कवितासंग्रह', 'कथासंग्रह', 'कादंबरी' या पैकी एका प्रकारातील लेखन सादर करावयाचे आहे. स्पर्धा १ ऑगस्ट २०१२ सकाळी ९ वा. खुली होईल व प्रवेशिका घेण्याची सुरवात होईल. सर्व प्रवेशिका mimarathi.net वरील 'पुस्तक परिचय स्पर्धा' विभागात ऑनलाईन पद्धतीने किंवा ऑफलाईन पद्धतीने (पोस्टाने/कुरिअरने) द्यायच्या आहेत. (mimarathi.net) येथे सदस्यत्व घेण्यासाठी तसेच लेखन करण्यासंबंधी मदतीसाठी info@mimarathi.net यांच्याशी ई-मेल द्वारे किंवा ९७३००२७७०१ या क्रमांकवर संपर्क साधावा. प्रवेशिका ३० सप्टेंबर २०१२, रात्री १२ वाजेपर्यंत सादर करता येतील.



नियमावली

१. स्पर्धेसाठी कोणतेही प्रवेश मूल्य नाही. दिनांक १ ऑगस्ट २०१२ रोजी अठरा (१८) वर्षांहुन अधिक तसेच पन्नास (५०) वर्षांहुन कमी वय असलेल्या सर्वांसाठी ती खुली आहे.

२. स्पर्धेत भाग घेण्यासाठी आपले स्वत:चे लेखन प्रवेशिका म्हणून देणे आवश्यक आहे, तुम्ही एकापेक्षा अधिक प्रवेशिका देऊ शकता.

३. लेखनाचा प्रकार हा 'पुस्तक परिचय' असा ठेवण्यात आला आहे. अन्य भाषेतून अनुवादित पुस्तकांचा परिचय स्पर्धेसाठी प्रवेशिका म्हणून स्वीकारल्या जातील.

परिचयासाठी निवडलेले पुस्तक खालीलपैकी एका साहित्यप्रकारातील असावे.

१. ललित लेखसंग्रह
२. कथासंग्रह (लघुकथा/दीर्घकथा)
३. कादंबरी
४. काव्यसंग्रह

४. या स्पर्धेसाठी प्रवेशिका दोन प्रकारे सादर करता येतील.

अ. पहिल्या प्रकारात प्रवेशिका ऑनलाईन पद्धतीने mimarathi.net येथे थेट सादर करता येतील. टंकलेखन सहाय्यक म्हणून गमभन (www.gamabhana.com) किंवा बराहा / गुगल आयएमई चा अथवा कोणत्याही युनिकोड देवनागरी फॉन्ट्सच्या सहाय्याने टंकलिखित करून mimarathi.net येथे सादर करता येतील.

ब. ऑफलाईन पद्धतीने सादर करण्यासाठी टंकलिखित (हस्तलिखित प्रवेशिका ग्राह्य धरली जाणार नाही) प्रवेशिका खालील पत्त्यावर पोस्टाने/कुरिअरने स्पर्धेच्या अंतिम तारखेपूर्वी पोचतील अश्या प्रकारे पाठवण्यात याव्यात. पोस्ट अथवा कुरियर सेवेतील दिरंगाईमुळे प्रवेशिका उशीरा पोहोचल्यास सदर प्रवेशिका ग्राह्य धरली जाणार नाही. तसेच त्याबाबात कोणताही पत्रव्यवहार अथवा खुलासे देण्यास स्पर्धा आयोजक बांधील असणार नाहीत. तसेच सादर केलेली प्रवेशिका कोणत्याही परिस्थितीत परत केली जाणार नाही. सबब सर्व स्पर्धकांना विनंती की त्यांनी प्रवेशिकेची एक प्रत आपल्यापाशी ठेवावी.

पत्ता: -

‘पुस्तक परिचय स्पर्धा २०१२’
द्वारा: रसिक साहित्य प्रा. लि.
६८३, बुधवार पेठ,
अप्पा बळवंत चौक,
पुणे – ४११ ००२

५. आंतरजालावर mimarathi.net अथवा अन्यत्र पूर्वप्रकाशित लेखन स्पर्धेसाठी सादर करावयाचे असल्यास स्पर्धा विभागात नव्याने प्रसिद्ध करावे लागेल. मुद्रित माध्यमात आधीच प्रसिद्ध झालेले लिखाण प्रवेशिका म्हणून ग्राह्य धरले जाणार नाही.

६. स्पर्धेत सहभागी होणार्‍या प्रत्येक व्यक्तीने खालील तपशील 'competition2012@mimarathi.net' या ईमेल पत्त्यावर ताबडतोब कळवणे आवश्यक आहे.

      • लेखकाचे मूळ नाव (टोपणनावाने प्रवेशिका सादर केली असली तरी स्पर्धेच्या निकालात मूळ नावाची घोषणा केली जाईल.)
      • प्रवेशिकेचा mimarathi.net वरील दुवा (लिंक)
      • संपर्क क्र., विरोप पत्ता (ई-मेल)
      • ब्लॉग पत्ता अथवा वैयक्तिक संकेतस्थळाचा (वेबसाईट) चा पत्ता (असल्यास)
      • पत्रव्यवहारासाठी पत्ता (अनिवासी भारतीयांनी भारतातील पर्यायी पत्त्ता देणे आवश्यक).

७. एखादी प्रवेशिका स्वीकारण्याचा वा नाकारण्याचा हक्क स्पर्धेचे आयोजक राखून ठेवत आहेत. तसेच स्पर्धेसाठी सादर केलेली प्रवेशिका कोणत्याही कारणास्तव मागे घेता येणार नाही.

८. अपेक्षेहून अधिक प्रवेशिका आल्यास अंतिम तारखे आधीच प्रवेशिका घेणे थांबवण्याचा हक्क स्पर्धा आयोजक राखून ठेवत आहे.

९. प्रवेशिका म्हणून सादर केलेल्या लेखनामध्ये शुद्धलेखनाचा किमान दर्जा राखणे ही स्पर्धकाची जबाबदारी आहे याची कृपया नोंद घ्यावी.

१०. सर्व प्रवेशिकाचे परिक्षण साहित्यिक क्षेत्रातील मान्यवर व्यक्ती करतील. परिक्षकांची नावे यथावकाश जाहीर केली जातील.

११. स्पर्धेचा निकाल स्पर्धा संपल्यानंतर सुमारे तीन आठवड्यानंतर जाहीर केला जाईल, जो mimarathi.net या संकेतस्थळावर तसेच निवडक मुद्रित वितरणातून जाहीर केला जाईल.

१२. निकालाबाबत स्पर्धा आयोजकांनी नियुक्त केलेल्या परिक्षकांचा निर्णय अंतिम राहील. यासंबंधी कोणतेही खुलासे देण्यास वा पत्रव्यवहार करण्यास स्पर्धा आयोजक, 'रसिक साहित्य' तसेच mimarathi.net बांधील नाहीत याची कृपया नोंद घ्यावी.

१३. स्पर्धेतील प्रत्येक साहित्य प्रकारामधील पहिल्या तीन विजेत्यांना पारितोषिके देण्यात येतील. याशिवाय स्पर्धेला मिळणार्‍या प्रतिसादावरून व अन्य लेखनाच्या दर्जानुसार स्पर्धेतील सर्व साहित्य प्रकार मिळून पाच उत्तेजनार्थ पारितोषिके देण्यात येतील.

१४. पारितोषिक वितरणाचा कार्यक्रम अंदाजे ऑक्टोबर २०१२च्या अंतिम सप्ताहात आयोजित केला जाईल. कार्यक्रमाचा तपशील यथावकाश जाहीर केला जाईल.

१५. स्पर्धेच्या लेखनाचे संकलन प्रकाशित करण्याचा अधिकार आयोजक राखून ठेवत आहेत. स्पर्धेसाठी प्रवेशिका सादर करण्याचा निर्णय घेतानाच स्पर्धकाने आपली प्रवेशिका अशा संकलनात प्रकाशित करण्याचा अधिकार आयोजकांना दिल्याचे मान्य केले आहे असे समजण्यात येईल. सदर प्रवेशिकेबाबत याशिवाय कोणताही अधिकार अथवा जबाबदारी पूर्णपणे स्पर्धकाची राहील याची कृपया नोंद घ्यावी.

१६. सदर स्पर्धेची जाहिरात विविध माध्यमातून प्रसारित करण्यात येणार आहे. अनेक हितचिंतकांना सदर माहिती अधिकाधिक लोकांपर्यंत पोचवण्याची विनंती करण्यात आली आहे. या विविध माध्यमातून प्रसिद्धीदरम्यान सदर माहिती मधे होणार्‍या सहेतुक/निर्हेतुक बदलांशी आयोजक सहमत असतीलच असे नाही. mimarathi.net येथे प्रसिद्ध करण्यात आलेल्या स्पर्धा सूचनेच्या धाग्यावरील मसुदा अंतिम मानण्यात येईल.

*******************

mimarathi.net
लेखन स्पर्धेची माहीती देणारा बॅनर आपल्या ब्लॉगवर वर वापरण्यासाठी खालील खिडकीतील कोड कॉपी करा.

{वाह}

वाह. क्या बात है !!!

म्हंजे मेजवानीच म्हणायची.

सर्व स्पर्धकांना शुभेच्छा.

-----


----------------------------------------------------------------------------------------
One of the sad signs of our times is that we have demonized those who produce, subsidized those who refuse to produce, and canonized those who complain ___ Sowell

{सर्व स्पर्धकांना शुभेच्छा.}

सर्व स्पर्धकांना शुभेच्छा.

{सर्वांना शुभेच्छा, म्हणजे}

सर्वांना शुभेच्छा, म्हणजे उत्तम लेखनाची मेजवानीच मिळणार आहे.

{शुभेच्छा !}

शुभेच्छा !


*********************************
I'm doing my bit to save bandwidth by deleting my signature...

{सर्वांना शुभेच्छा}

{अजून एक?}

अरे वा. मालक, नॉट लिसनिंग (ऐकत नाही) हं.


Every 'ism' is euphemism, every religion a contagion.

{नव्या स्पर्धेनिमीत्त हार्दिक}

नव्या स्पर्धेनिमीत्त हार्दिक अभिनंदन आणि इच्छुक स्पर्धकांना मनःपूर्वक शुभेच्छा !

{ज्ये बात..... धम्माल येणार}

ज्ये बात..... धम्माल येणार आहे. सर्व स्पर्धकांना खूप खूप शुभेच्छा हास्य हास्य

आणि हो मालकांचे ईशेष अभिनंदन


*-*-*-*-*-*-*-*-*-*-*-*-*-*-*-*-*-*-*-*-*-*-*-*-*-*-*

I couldn't wait for success, so I went ahead without it !!

मन उधाण वार्‍याचे…

{सर्वाना शुभेच्छा!}

सर्वाना शुभेच्छा! हास्य

{गब्बर सिन्ग ,विवेक मोडक}

गब्बर सिन्ग ,विवेक मोडक ,अस्मि ,स्वामी संकेतानंद,अभिजितमोहोळकर,विशाल कुलकर्णी,सुहास झेले व झकासराव काय चालु काय आहे? जो येतोय तो स्पर्धकांना खूप खूप शुभेच्छा, उत्तम लेखनाची मेजवानीच मिळणार आहे, वाचायला मजा येइल असे प्रतिसाद देतो आहे. Angry

स्पर्धेत सहभागी होण्याचे कोणी बोलतच नाही angery

वर उल्लेख केलेल्याने प्रत्येकी किमान एक - एक पुस्तक परीक्षण टाकावे - हुकुमावरुन


------------------------------------------------------------------------------
I will win, not “Immediately” but “Definitely”!!

{बरं मालक एक मस्त पुस्तक}

बरं Innocent

मालक एक मस्त पुस्तक पाठवून द्या, तुमच्या मंडळींचा हुकुम आहे. एक परीक्षण नक्की देईन हास्य हास्य


*-*-*-*-*-*-*-*-*-*-*-*-*-*-*-*-*-*-*-*-*-*-*-*-*-*-*

I couldn't wait for success, so I went ahead without it !!

मन उधाण वार्‍याचे…

{असेच म्हणतो}

<<मालक एक मस्त पुस्तक पाठवून द्या, तुमच्या मंडळींचा हुकुम आहे. एक परीक्षण नक्की देईन >>

असेच म्हणतो wink

{(विषय दिलेला नाही)}

Sick


------------------------------------------------------------------------------
I will win, not “Immediately” but “Definitely”!!

{आ हा}

हे बघ दोन सापडले. ते पुस्तक देऊन आमंत्रित करण्याच्या यादीत टाक यांची नावे. बरे सापडले आता.


Every 'ism' is euphemism, every religion a contagion.

{(विषय दिलेला नाही)}

{सूचना}

स्पर्धेच्या आखणीविषयी या अगोदर थोडीफार माहिती होतीच, पण आता प्रत्यक्ष त्या संदर्भातील धागा वाचताना रसिक साहित्य आणि मीमराठी टीमने किती सुरेखपणे याचे नियोजन केल्याचे जाणवले. नियमावली स्वयंस्पष्ट आहेच आणि त्यातही वय वर्षे ५० ची जी अट घातली आहे ती योग्यच असल्याचे मी समजत आहे.

पुस्तक निवडीची कालावधी २० वर्षाचा ठेवला आहे, जो उचितच आहे. या काळात कथा/कादंबरीपेक्षाही ललित साहित्याने प्रकाशन क्षेत्रात लक्षणीय कामगिरी केल्याचे दिसून येईल. अर्थात ज्याना "लोकप्रियता" भरभरून लाभली आहे अशा कादंबर्‍यांचीही या स्पॅनमध्ये चलती होतीच. थोडक्यात स्पर्धेत भाग घेऊ इच्छिणार्‍या प्रत्येकास लेखनिवडीसाठी खूप स्वातंत्र्य लाभू शकेल.

(शुद्धलेखनाचा आग्रह धरल्याबद्दल संयोजक समितीचे मनःपूर्वक आभार. ही अपेक्षा अत्यंत योग्य आहे आणि स्पर्धकच नव्हे तर परीक्षक समितीही परीक्षणाच्यावेळी ती कटाक्षाने पाळतील असे गृहित धरतो.)

काही सूचना :

१. 'मराठी भाषेतील पुस्तक' असे नियमावलीत म्हटले आहे. याचा अर्थ 'अनुवादित' पुस्तक परिचयासाठी घेतले जाईल किंवा नाही, याचा स्पष्ट खुलासा आत्ताच करावा. त्या वीस वर्षात इंग्रजी तसेच विविध भारतीय भाषातील अनेक सुंदर पुस्तकांचे मराठी अनुवाद इथल्या प्रकाशकांनी प्रसिद्ध केले असून त्याना चांगलीच लोकप्रियताही लाभल्याचा इतिहास आहे. त्यामुळे असे एखादे पुस्तक स्पर्धकाने निवडल्यास ते स्वीकारले जाईल किंवा नाही हे अगोदर त्याला कळणे क्रमप्राप्त आहे.

२. पुनर्मुद्रण पुस्तक ~ १९९० ते २०१० या काळात एखाद्या दुर्मिळ पुस्तकाचे पुनर्मुद्रण बाजारात आले असेल तर (उदा. शशी भागवत, नाथ माधव, वि.वा.हडप, द.वा.घाटे आदी अनेक दिग्गज) तर त्यांच्या साहित्याचा स्पर्धेसाठी विचार केला जाऊ शकतो ? किंवा नियम कालावधीत 'प्रथम प्रकाशन' असेल तरच ते पुस्तक विचारार्थ घेतले जाईल ?

टीम सदस्यांचे पुन्हा एकदा अभिनंदन आणि इच्छुक स्पर्धकांना हार्दिक शुभेच्छा.

अशोक पाटील

{काका अतिशय योग्य मुद्दे}

काका अतिशय योग्य मुद्दे मांडले आहेत आपण. ह्यावर मालक प्रतिसाद देतीलच हास्य


------------------------------------------------------------------------------
I will win, not “Immediately” but “Definitely”!!

{मालक, एक प्रवेशिका आली}

मालक, एक प्रवेशिका आली सुद्धा, आहात कुठे? हास्य

{मालक, एक प्रवेशिका आली}

मालक, एक प्रवेशिका आली सुद्धा, आहात कुठे? >>> मालक बाहेर! Big smile

प्रवेशिका घेणे अजुन चालु केले नाही त्यामुळे त्यांना नियम क्र.५ अनुसार ते लेखन स्पर्धा विभागात नव्याने प्रसिद्ध करावे लागेल. Big smile


------------------------------------------------------------------------------
I will win, not “Immediately” but “Definitely”!!

{मालक बाहेर !>>>>एवढ्या लवकर}

मालक बाहेर !>>>>

एवढ्या लवकर घराबाहेर काढलंस मालकांना !
काय हे लग्नाला जुन एक वर्षपण नाही झालं तोवर.... Evil

{एवढ्या लवकर घराबाहेर काढलंस}

एवढ्या लवकर घराबाहेर काढलंस मालकांना ! >>> मी बाहेर काढणार आणि मालक जाणार इतक चांगल नशिब नाही रे माझ Crazy


------------------------------------------------------------------------------
I will win, not “Immediately” but “Definitely”!!

{चला परत एकदा मेजवानीसाठी}


चला परत एकदा मेजवानीसाठी तयार.

{उत्तम स्पर्धा..}

यंदाच्या स्पर्धेत स्पर्धाविषयच इतका आगळावेगळा आहे की स्पर्धा नावीन्यपूर्ण होणार यात शंकाच नाही.

या आधी समीक्षात्मक लिखाणाची स्पर्धा कधी ऐकण्यात आली नव्हती. समीक्षक / परीक्षक हे स्वतःच सर्वोच्च न्यायाधीश (जज) असल्याच्या अविर्भावात असतात, त्यामुळे त्यांना जोखणारं कोणी नसतंच.. हास्य

पण एकच शंका..

फक्त कथा ललित ? वैज्ञानिक / तत्वज्ञान / आर्थिक अशा विषयांवर उत्तमोत्तम साहित्य आहे की.. हा स्कोप वाढवता नाही का येणार?

शास्त्रीय / ललित इंग्रजी पुस्तकाचं परीक्षण करायला हरकत नसावी.. शक्य आहे काय?

{>>वैज्ञानिक / तत्वज्ञान /}

>>वैज्ञानिक / तत्वज्ञान / आर्थिक

खरं आहे, हा स्कोप वाढवता आला असता देखील, पण काही तांत्रिक मुद्दामुळे वरील चारच विभाग स्पर्धेसाठी ग्राह्य धरले आहेत.


something terribly wrong with this country, isn't there?

{सहमत}

गविं शी सहमत.

व्यक्तिचित्र, आत्मचरित्र, प्रवास वर्णन हे साहित्य प्रकारांचा देखील विचार व्हावा. असे वाटते.

{सर्व स्पर्धकांना खूप खूप}

सर्व स्पर्धकांना खूप खूप शुभेच्छा

आणि हो मालकांचे ईशेष अभिनंदन

{स्पर्धा १ ऑगस्ट २०१२ पासून}

स्पर्धा १ ऑगस्ट २०१२ पासून चालू होईल, व त्याचा लेखन विभाग "पुस्तक परिचय स्पर्धा" हा लेखन करण्यासाठी त्याच दिवशी सकाळी सुरू केला जाईल. याची सर्व वाचकांनी नोंद घ्यावी.


something terribly wrong with this country, isn't there?

{विजिट}

आमच्या ब्लॉगावर विजिट टाकण्यात आले आहे. इतरांनीही आपापल्या ब्लॉगावर टाकावे ही इनंती.


Every 'ism' is euphemism, every religion a contagion.

{मालकांनी धागा टाकला, मी विजिट}

मालकांनी धागा टाकला, मी विजिट टाकले हास्य हास्य


*-*-*-*-*-*-*-*-*-*-*-*-*-*-*-*-*-*-*-*-*-*-*-*-*-*-*

I couldn't wait for success, so I went ahead without it !!

मन उधाण वार्‍याचे…

{आमी दोनीबी टाकलय ब्लॉगवर}

आमी दोनीबी टाकलय ब्लॉगवर आमच्या हास्य
विजेट आणि धागा दोन्हीही wink
चेपुवर पण झायरात केलीय wink

{म्या पन}

टाकले माझ्या ब्लॉगवर

{ररा, विशाल, सुहास,}

ररा, विशाल, सुहास, अभिजीत

धन्यवाद हास्य


something terribly wrong with this country, isn't there?

{शुभेच्छा!}

शुभेच्छा!

{जाहिरात}

अस्मादिकाकडे ब्लॉग तसेच थोबू खिडक्या नसल्याने जमेल तितकी व तितक्यांच्याकडे स्पर्धेविषयी मौखिक आणि लिखित स्वरूपाने कळविणार आहे.

अशोक पाटील

{असच आम्हीपण म्हणतो !}

असच आम्हीपण म्हणतो !

{हरकत नाही पण जाहिरात करा! (}

हरकत नाही पण जाहिरात करा! ( हे महत्त्वाचे ) हास्य


------------------------------------------------------------------------------
I will win, not “Immediately” but “Definitely”!!

{लय भारी रे राज ! बाकी}

लय भारी रे राज !

बाकी आमच्यासारख्यांसाठी लय अवघड ईषय घेतला राव Sad

{ललित लेख }


ललित लेख
कथासंग्रह (लघुकथा/दीर्घकथा)
कादंबरी
काव्यसंग्रह
>>>> Sad

नरहर कुरुंदकरांचे काही ग्रंथ आमच्या चांगल्या परिचयाचे आणी उपरोक्त कालावधित प्रकाशित झालेले असे आहेत.पण ते सर्व सामाजिक विषयातले आहेत... आपल्या उपरोक्त चारात ते बसत नाहीत,आंम्ही काय करावे...?

म्हणजे या चारातलं काही लिहिता येणार नाही,असं नव्हे...पण मनात ज्याची जास्त इच्छा आहे,आणी या स्पर्धे साठी एक नाविन्य म्हणुनही कुरुंदकर(च) जास्ती मनात आहेत,,,तेंव्हा चालेल काय...? इतकेच विचारायचे आहे. हास्य


०==========०============०==========०============०==========०============०======
e हलौकिक जग हे अर्धसत्य आहे...

{'आमच्या माहितीनुसार}

'आमच्या माहितीनुसार कुरुंदकरांचे बहुतेक लिखाण या चार विभागात बसत नसल्याने त्यांच्या पुस्तकांचे परिचय चालणार नाहीत.' जर एखादे त्यांचे पुस्तक -आमच्या नजरेतून निसटले असेल - आणि ते या चारपैकी एका प्रकारचे असेल नि ठरवून दिलेल्या मुदतीत प्रकाशित झाले असेल तर ते अवश्य चालेल.


something terribly wrong with this country, isn't there?

{लेखकांना शुभेच्छा!}

लेखकांना शुभेच्छा!

{नव्वदीच्या दशकानंतर प्रसिध्द}

नव्वदीच्या दशकानंतर प्रसिध्द झालेली पुस्तके फारशी वाचनात आलीच नाहीत.ह्या स्पर्धेच्या निमित्ताने आता काही कसदार पुस्तकांचा परिचय होईल अशी अपेक्षा करतो.सर्व वाचकप्रेमींनी स्पर्धेला भरभरून प्रतिसाद द्यावा असे आवाहन आणि विनंती करतो.


..............................................................

क्या फर्क पडता है?

{सर्व स्पर्धकांना खूप खूप}

सर्व स्पर्धकांना खूप खूप शुभेच्छा

{शुभेच्छा!}

चला या निमित्ताने उत्तमोत्तम पुस्तकांची माहिती होईल. उत्तम प्रकल्प शुभेच्छा!
सक्रीय सहभागाचा प्रयत्न करेन

जी परिक्षणे छापिल / पोष्टाने पाठवली जातील त्यांना मी मराठीवरही प्रकाशित करता येईल का? टंकन वेळखाऊ असेल तर किमान स्कॅन्ड इमेज चढवता येईल का?


-ऋ

{शुभेच्छा, लेखनाची वाट पाहतो}

शुभेच्छा, लेखनाची वाट पाहतो आहे.


निव्वळ संख्येवर सत्य ठरू शकते का ? मताधिक्याने सत्य सिद्ध होऊ शकते का ?

{गविं शी सहमत. व्यक्तिचित्र,}

गविं शी सहमत.

व्यक्तिचित्र, आत्मचरित्र, प्रवास वर्णन ह्या साहित्य प्रकारांचा देखील विचार व्हावा. असे वाटते.

{मला वाटतं व्यक्तिचित्र,}

मला वाटतं व्यक्तिचित्र, आत्मचरित्र, प्रवास वर्णन हे प्रकार ललितमधे गणले जायला हरकत नसावी. फक्त शास्त्रीय (अर्थशास्त्र, विज्ञान, सामाजिक, अमराठी आदिंचा उल्लेख मी केला होता..)

अधिक खुलासा व्यवस्थापक करतीलच..

{एखादे पुस्तक वरीलपैकी}

एखादे पुस्तक वरीलपैकी कोणत्याही एका प्रकारात मोडते की नाही याचा (किंवा एकुणच प्रवेशिकेच्या ग्राह्यतेबद्दलचा) निर्णय त्या पुस्तकाचे आयसबीएन वर्गीकरणानुसार घेतला जाईल. ते उपलब्ध नसल्यास परिक्षकांवरच तो सोपवलेला आहे. त्यामुळे एखादी प्रवेशिका ग्राह्य मानायची की नाही याची चर्चा, खुलासे इथे देण्यात येणार नाहीत.

व्यवस्थापक

{एखादे पुस्तक वरीलपैकी}

एखादे पुस्तक वरीलपैकी कोणत्याही एका प्रकारात मोडते की नाही याचा (किंवा एकुणच प्रवेशिकेच्या ग्राह्यतेबद्दलचा) निर्णय त्या पुस्तकाचे आयसबीएन वर्गीकरणानुसार घेतला जाईल. ते उपलब्ध नसल्यास परिक्षकांवरच तो सोपवलेला आहे. त्यामुळे एखादी प्रवेशिका ग्राह्य मानायची की नाही याची चर्चा, खुलासे इथे देण्यात येणार नाहीत.

पण जिथे शंका आहे तिथे ही माहिती आधीच स्पष्ट होणं आवश्यक आहे. मी एका प्रवासवर्णनाचं परीक्षण त्याला ललित समजून करण्याच्या विचारात असेन तर ते पूर्ण लिहून झाल्यावर मग परीक्षकांकडून नाकारले जाणं हे (लेखक आणि परीक्षक दोहोंचा) वेळ आणि श्रम यांचा अपव्यय आहे. त्यापेक्षा प्रवासवर्णन आणि अन्य उल्लेखित प्रकार हे "ललित"च्या व्याख्येत येतात का हे लिहिण्याआधीच स्पष्ट झाल्यास आनंद होईल.

फक्त "कथा आणि कविता" किंवा "फिक्शन - काल्पनिक" असं स्वरुप असतं तर संदिग्धता राहिली नसती. पण ललित शब्दाने जरा मोठा भाग त्यात सामावला गेला.. म्हणून..

{माझेही मत}

मला वाटतं लौकरात लौकर प्रत्येक विभागाखाली अंतर्भूत प्रकारांचा तपशील देवून ही चर्चा थांबवावी कारण असं होऊ शकत की काही जण ह्या चर्चेतून काय निष्पन्न होतंय ह्यासाठी थांबायला नकोत. असंही नको व्हायला की काहींनी पुस्तक निवडलं असेल पण ह्या चर्चेनंतर त्यांना फेर-विचार करावा लागेल.

मला काय म्हणायचंय हे मी नीट लिहिलंय का ते कळायला मार्ग नाही पण भा.पो. असावी. हास्य

{माझ मत}

माझे वैयक्तिक मतः
चर्चा करायची झाली कीस काढायचा झाला तर बराच खल करता येतो. किती करावा हा ज्याच्या त्याचा प्रश्न. ललित लेख असे वर्गीकरण आहे. लेखसंग्रह (हे अपेक्षित आहे असे वाटते) याचा अर्थ स्वतंत्र, परस्परसंबंध नसलेल्या एकाहुन अधिक 'ललित' लेखांचा संग्रह. अर्थातच जे लेख इतर विशिष्ट वर्गीकरणात बसतात ते इथे येणार नाहीत. अभ्यासू, विवेचनात्मक, विशिष्ट विषयांशी संबंधित लेखन हे अर्थातच ललित या सदरात येणार नाही हे उघड आहे. ललित लेखनात प्रामुख्याने अनुभव आणि कल्पनाविस्तार स्वरूपाचे लेख असतात असे मी मानतो. (याशिवायच्या लेखनाला स्वतःची अशी वर्गवारी असते. ) हे बव्हंशी स्वतंत्र लेखन असते. ते स्वतः उभे असते. त्यात 'लालित्य' हा महत्त्वाचा गुण असावा लागतो. यामुळे निव्वळ पुस्तक परिचय हे ललित लिखाण होत नाही, पण त्याचे रसग्रहण हा मात्र ललित लेखनाचा भाग आहे कारण यात मूळ लेखनापलिकडे तुमच्या स्वत:च्या अनुभूतीचा, मांडणीचा, शैलीचा एक वेगळा - ललित - धागा त्यात मिसळलेला असतो. निव्वळ ते पुस्तक वाचण्यापलिकडे काही अधिक असा अनुभव तुम्ही वाचकाला देत असता. तुम्ही उल् उल्लेख केलेल्या पुस्तकप्रकारात हा अधिकचा भागे येतो का हे तुमचे तुम्हाला तपासून पाहता आले तर तुमच्या प्रश्नाचे उत्तर तुम्हाला मिळेल.

हे थोडेसे स्वैर विचार आहेत. जसे डोक्यात आले तसे. हे चर्चा वाढवण्यासाठी नव्हे तर 'थांबावी' या उद्देशाने लिहिले आहे. जगात काळे-पांढरे काही नसते. ते निश्चित करणारे अधिकारी व्यक्ती असतात त्यांनाच ते करू द्यावे. जिथे संदिग्धता वाटते ते सरळ बाजूला ठेवावे असे मला वाटते.

आत्मचरित्र वगैरे 'लेख' असतात का यावर भरपूर चर्चा करता येईल. प्रत्यक्ष प्रकाशकाने केलेल्या वर्गीकरणाबाबतही मतभेदांच्या फैरी झडतातच. नगरकरांच्या 'सात सक्कं त्रेचाळीस' विलास सारंगांच्या रुद्र'ला कादंबरी का म्हणावे यावर भरपूर मतभेद असू शकतात. पण सध्या ही दोन्ही पुस्तके ग्रंथालयात कादंबरी म्हणून नोंदली आहेत यासाठी ग्रंथालयाच्या काउंटरवर बसणार्‍याशी वाद करून काही साधत नाही. स्पर्धा आयोजक हे अखेर प्रकाशकांच्या, परिक्षकांच्या निर्णयावर अवलंबून असावेत. त्यांनी स्वतंत्रपणे याबाबत निवाडा करणे यातून तर मतभिन्नता आली तर या दोघांच्या अधिकाराला अव्हेरल्यासारखे होते.

आणखी एक. आज आपण ऑनलाईन आहोत. विविध संस्थांकरवी मुद्रित माध्यमासाठी स्पर्धा घेतल्या जातात तेव्हा असे जाहीर चर्चेचे खंडन-मंडनाचे स्वातंत्र्य आपल्याला असते का याचा विचार करावा. त्या स्थितीत आपण काय निर्णय घेतला असता असा विचार करून निर्णय घ्यावा इतकेच. आता ऑनलाईन व्यवस्थेमुळे चर्चेची संधी आहे ती का नाकारावी हा मुद्दा येईल तो मान्यच आहे. पण त्याचबरोबर दुसर्‍या बाजून १००% मतैक्य जवळजवळ अशक्यच आहे हे ही बहुतेकांना मान्य असावे. तेव्हा स्पर्धा आयोजकांनी दिलेले उत्तर मला मान्य नाही असे म्हणणारे चार लोक नेहमीच उभे असणार. स्पर्धा संपल्यावर तर नक्कीच उभे राहतात हा आधीच्या स्पर्धांचा अनुभव आहेच. तेव्हा तारतम्याचा विचार अधिक ठेवावा नि चर्चेची गुर्‍हाळे थांबवावीत हे आवाहन करतो.


Every 'ism' is euphemism, every religion a contagion.

{बरं. धन्यवाद.}

बरं.

धन्यवाद.

{स्पर्धा चालू होण्यासाठी फक्त}

स्पर्धा चालू होण्यासाठी फक्त २२ तास राहिले Big smile


------------------------------------------------------------------------------
I will win, not “Immediately” but “Definitely”!!

{स्पर्धेमध्ये सर्वांचे स्वागत}

स्पर्धेमध्ये सर्वांचे स्वागत आहे, प्रवेशिका घेण्यासाठी सुरवात झालेली आहे.
सर्व स्पर्धकांना मीमराठी.नेट व रसिक साहित्य प्रा.लि. तर्फे हार्दिक शुभेच्छा.

{सर्वांना हार्दीक शुभेच्छा}

तोडा मित्रांनो तोडा!!! हास्य

{स्पर्धेसाठी हार्दिक}

स्पर्धेसाठी हार्दिक शुभेच्छा.. स्पर्धा आयोजकांना आणि स्पर्धेत सहभागी होण्यार्‍या सर्वांना..


माझ्यातला मी उरला फक्त व्याकरणापुरता...

{उत्तम उपक्रम...राजे लय}

उत्तम उपक्रम...राजे लय फॉर्मात ! Cool


*********************************************************
शब्द असू दे हातामध्ये काठी म्हणुनी...वाट आंधळी प्रवास खडतर बोलू काही...!

माझ्या मनातले काही

{५१ ते १००}

पुढील स्पर्धेतून आम्हा साठीतील लोकांना हुसकावू नये. ५१-१०० या रेंजमधील काही लोकांचे डोळेही पुस्तक वाचू शकतात व हात की-बोर्डींग करू शकतात.
असो. सर्वाना शुभेच्छा.

{हा हा हा! वयाची अट का या}

हा हा हा!
हास्य
वयाची अट का या बद्दल मेल करतो काका wink


something terribly wrong with this country, isn't there?

{स्पर्धाकांनी प्रवेशिका}

स्पर्धाकांनी प्रवेशिका पाठवताना नियमावली पुर्ण वाचावी ही विनंती.


something terribly wrong with this country, isn't there?

{मालक...}

सगळ्यात आधी मालकांचे मनापासुन अभिनंदन आणि खुप खुप कौतुक.
ह्या अशा वेगवेगळ्या उपक्रमांमुळेच मी-मराठीचे वेगळेपण जपुन आहे.. टिकुन आहे.

शक्य तितक्या जणांना ह्या उपक्रमाबद्दल माहिती देत आहे. माझ्या मित्र-मंडळींकडून किमान दहा तरी एन्ट्र्या नक्की...
हास्य

राजे... पुन्हा एकदा कौतुक, अभिनंदन आणि शुभेच्छा.

{धन्यवाद.}

धन्यवाद.


something terribly wrong with this country, isn't there?

{सर्व स्पर्धकांनी हा नियमाचा}

सर्व स्पर्धकांनी हा नियमाचा धागा पुर्ण वाचावा व जे नियम पाळायचे अपुर्ण राहीले आहेत ते पाळावेत ही विनंती.


something terribly wrong with this country, isn't there?

{राजे, शब्द मोजायची आवश्यकता}

राजे, शब्द मोजायची आवश्यकता आहे का ? thinking


*********************************************************
शब्द असू दे हातामध्ये काठी म्हणुनी...वाट आंधळी प्रवास खडतर बोलू काही...!

माझ्या मनातले काही

{२००० शब्द कमी नाही होत. किमान}

२००० शब्द कमी नाही होत. किमान १० पाने होतात रे हास्य


something terribly wrong with this country, isn't there?

{स्पर्धेसाठी सर्वांना शुभेच्छा..}

स्पर्धेसाठी सर्वांना शुभेच्छा..
स्पर्धेच्या निमित्ताने काही आधीपासून डोक्यात असेल तर ते लिहिलं जातं हा यावेळचा अनुभव.अर्थात ही वरची चर्चा न वाचताच एक परिक्षण टाकलं आहे. कदाचीत स्पर्धेसाठी पात्र होणार नाही पण आता लिहिले तर गेलेय...हास्य
यंदा प्रवेशिका कमी वाटताहेत का?? एक शंका...

{>>>यंदा प्रवेशिका कमी}

>>>यंदा प्रवेशिका कमी वाटताहेत का?? एक शंका...

हास्य

खरं आहे. शक्यतो नियमांची खूपच गर्दी झाली.
नियमावली मध्ये लवकरच बदल होत आहेत, एक-दोन दिवसामध्ये संबधित व्यक्तींची भेट होऊन, नियमांचा धागा व अंतिम दिनांक अद्यावत होईल.


something terribly wrong with this country, isn't there?

{शक्य असेल तर मुदतही वाढवा}

शक्य असेल तर मुदतही वाढवा !
अनुवादितांबद्दलचा मुद्दाही विचार करण्यासारखा आहे मालक !

{+१}

शक्य असेल तर मुदतही वाढवा !

प्लीजजजजजज Innocent


*-*-*-*-*-*-*-*-*-*-*-*-*-*-*-*-*-*-*-*-*-*-*-*-*-*-*

I couldn't wait for success, so I went ahead without it !!

मन उधाण वार्‍याचे…

{अजुन एक 'पुर्वेप्रकाशित'}

अजुन एक 'पुर्वेप्रकाशित' साहित्य चालेल का?
चालणार असेल तर मला माझे मागे टाकलेले 'रात्र काळी घागर काळी' स्पर्धेत उतरवता येइल Evil

{मोहापासून दूर रहा रे}

मोहापासून दूर रहा रे वत्सा.... Evil


*********************************
I'm doing my bit to save bandwidth by deleting my signature...

{तुमची अर्धी लाकडी गेली मसणात}

तुमची अर्धी लाकडी गेली मसणात स्वामी...
मै तो अभी जवान हूं.....

{अरे वा! अजून एक महिना मुदत}

अरे वा! अजून एक महिना मुदत आहे. आम्ही आहोतच तयार...

{ज्यांनी ज्यांनी ब्लॉगवर ही}

ज्यांनी ज्यांनी ब्लॉगवर ही माहीती प्रकाशित केली आहे त्यांनी ती अद्यावत करावी ही विनंती


something terribly wrong with this country, isn't there?

{धन्यवाद मालक ! आजच करतो}

धन्यवाद मालक !
आजच करतो हास्य

{(विषय दिलेला नाही)}

हास्य


something terribly wrong with this country, isn't there?

{यप्प... करतो}

यप्प... करतो हास्य हास्य


*-*-*-*-*-*-*-*-*-*-*-*-*-*-*-*-*-*-*-*-*-*-*-*-*-*-*

I couldn't wait for success, so I went ahead without it !!

मन उधाण वार्‍याचे…

{नियमात केलेल्या बदलांचे}

नियमात केलेल्या बदलांचे स्वागत.


निव्वळ संख्येवर सत्य ठरू शकते का ? मताधिक्याने सत्य सिद्ध होऊ शकते का ?

{सर्व सदस्यांच्या मागणीला मान}

सर्व सदस्यांच्या मागणीला मान देऊन स्पर्धापुर्वी सारखी चालू राहील याची आम्ही घोषणा करतो आहोत.

कळावे,

व्यवस्थापक


something terribly wrong with this country, isn't there?

{आलं लायनीवर ठ्यांकु मालक}

आलं लायनीवर wink
ठ्यांकु मालक हास्य

{त्येच म्हणलं.}

त्येच म्हणलं. हास्य

{:)}

काय काय उचापत्या करतील मालक, भरवसा र्‍हायला नाय.

ताळ्यावर आल्याबद्दल धन्स मालकानू

{राजेंचा विजय असो... अजून लेख}

राजेंचा विजय असो... Wave
अजून लेख येऊ द्या पटापटा...


*********************************************************
शब्द असू दे हातामध्ये काठी म्हणुनी...वाट आंधळी प्रवास खडतर बोलू काही...!

माझ्या मनातले काही

{(विषय दिलेला नाही)}

हास्य


... तुमचा अभिषेक

{धन्यु मालक!}

धन्यु मालक! हास्य