मेहदी हसन
25
आवडले!
एक दुखःद बातमी.
प्रसिध्द गझलगायक श्री मेहदी हसन ह्यांचे निधन झाले आहे.
बाकी काय लिहू?..... बात करनी, मुझे मुश्किल,कभी ऎसी,तो न थी....ऎवढेच म्हणू शकतो......................
.....................................................
......................ईश्वर त्यांच्या आत्म्याला सद्गगती देवो.


{अतिशय वाईट बातमी.}
अतिशय वाईट बातमी.
{अतिशय वाईट बातमी! आधी}
अतिशय वाईट बातमी! आधी जगजितसिंग आणि पाठोपाठ मेहंदी हसन!
ईश्वर त्यांच्या आत्म्यास शांती देवो!
माझी अनुदिनी....
{ईश्वर त्यांच्या आत्म्याला सद्गती देवो}
मेहदी हसन हे सुरूवातीला पाकिस्तानचे तलत महमूद म्हणून ओळखले जात. सुरूवातही त्यांनी तलतचीच गाणी म्हणून केली. पण प्रती-तलत म्हणून समाधान न मानता त्यांनी स्वतःची शैली विकसीत केली आणि एक स्वतंत्र गजलगायक म्हणून नाव कमावले.
त्यांना श्रद्धांजली म्हणून तस्वीर ह्या पाकी चित्रपटातील हे द्वंद्वगीत.
ऐ जाने वफा दिल में तेरी याद रहेगी
माझे लिखाण
माझे मीमवरील लिखाण
{सादर श्रद्धांजली}
सादर श्रद्धांजली
"ऐसी अक्षरे मेळविन !"
{अतिशय वाईट बातमी. }
अतिशय वाईट बातमी.
श्रद्धांजली
------------------------------------------------------------------------------
I will win, not “Immediately” but “Definitely”!!
{ईश्वर त्यांच्या आत्म्यास}
ईश्वर त्यांच्या आत्म्यास शांती देवो!
*-*-*-*-*-*-*-*-*-*-*-*-*-*-*-*-*-*-*-*-*-*-*-*-*-*-*
I couldn't wait for success, so I went ahead without it !!
मन उधाण वार्याचे…
{मोहोब्बत करने वाले..}
[video:http://youtube.com/watch?v=0szj2LdnpFw]
मोहोब्बत करने वाले कम ना होंगे.. तेरी मेहफिल मे लेकीन.. हम ना होंगे..
माझी एक अत्यंत आवडती गझल... या गझलेचे शब्द आहेत तसेच आता आपल्या मेह्फिलीत ते नसतील.. पण त्यांच्या आठवणी आणि गझला नक्कीच असतील..
ईश्वर त्यांच्या आत्म्यास शांती देवो...
{...............}
...............
something terribly wrong with this country, isn't there?
{ह्या आवाजात काय खास बात आहे?}
ह्या आवाजात काय खास बात आहे? प्रत्येक ऐकणाऱ्याला वेगळा अनुभव...पण एक गोष्ट मात्र खरी आवाजातला दर्द आणि कशिश सर्वच श्रोत्यांना जाणवली आणि हा आवाज प्रसिद्ध झाला....'मेहेदी हसन' ...
मेहेदी हसन ह्यांच्या आवाजाची ओळख मला माझ्या बाबांमुळे झाली...घरात रेकॉर्ड प्लेयर आणि ह्या उतमोत्तम गायकांच्या गझला असलेल्या रेकॉर्डस .... मेहेदी हसन त्यातले एक..."बात करनी मुझे मुश्कील",'रफ्ता रफ्ता' ,'गुलों मै रंग भरे' सारख्या एकाहून एक गाजलेल्या नज्मा ऐकल्या. बाबांचे सर्व गायक ,वादक मित्र मंडळ, संध्याकाळचा आठवड्यातला एक दिवस ठरलेला...घराच्या खालच्या खोलीत ह्या सर्व संगीताची आवड असलेल्यांची लहानशी मैफल रंगत असे...मग कधी एखाद प्रसिद्ध गायकाची गझल ऐकण्याचा कार्यक्रम...मेहेदी हसन ह्यांचा आवाज तेव्हां खूप वेळा ऐकला...प्रत्यक्षात मात्र कधी हा योग आला नाही पण त्यांच्या प्रसिद्ध गीतांचा आस्वाद घेता आला हे महत्वाचे...आज हा महान गायक आपल्यात नाही...पण ह्यांचा आवाज मात्र सदैव आपल्यात राहील...
[video:http://www.youtube.com/watch?v=tINK9mTjVHc]
{आधी जगजीत...}
आधी जगजीत; आता मेहदी हसन साहेब, देव म्हणा खुदा म्हणा काय फरक पडतो?.. त्या उप्परवाल्या नीली छतरी वाल्याला गजला ऐकायचा मूड झाला... अन आपल फार नुकसान झाल.
{आया मेरी मेहफिल में}
माझ्या माहीतीनुसार - १९५५ च्या आसपास रेडिओ पाकिस्तान कराची पासून मेहदी हसन यांच्या करियर ची सुरुवार झाली. आया मेरी मेहफिल में ... या गझले पासून. त्यानंतर जे घडले तो एक उज्ज्वल इतिहास आहे. मेहदी हसन यांचा शास्त्रोक्त संगीताचा सुरेख वापर, सुमधुर आवाज, उत्तमोत्तम गझलांची (शायरीची) निवड हे सगळंच परस्परपूरक ठरलं.
मी त्यांची गायकी ऐकायला सुरुवात केली ती १९९५ च्या आसपास - जेव्हा त्यांची कारकीर्द संपत आली होती. धागाकर्ते व आमचे मित्र, निवांत पोपट यांनी माझा मेहदी हसन यांच्या गझलांशी परिचय करून दिला. व त्याबद्दल निपोंचे ॠण आहेच ... व त्या ॠणातून मुक्त न व्हायलाच मला आवडेल.
नंतर इंटरनेटवरून मेहदी हसन यांच्या डझनावारी गझला खणूनखणून ऐकल्या. इतक्या की कधीकधी असं वाटायचं आपण पुरातत्व खात्याचे कर्मचारी आहोत की काय ?
मेहदी हसन यांच्या अनेक लक्षात राहण्यासारख्या गझला - आ के सज्जादा नशींन कैस हुआ मेरे बाद, खुली जो आंख तो, देख तो दिल के जां से, गुलों मे रंग भरे, बात करनी मुझे मुश्किल, एक तू ही नही जो मुझसे, मुबहम बात पहेली, चराग्-ए-तूर जालाओ बडा अंधेरा है, एक खलिश को हासिल्-ए-उम्र-ए-रवां रहने दिया या व इतर उत्तमोत्तम गझला ऐकायला मिळाल्या.
ग्रेट कलाकार गेला.
----------------------------------------------------------------------------------------
One of the sad signs of our times is that we have demonized those who produce, subsidized those who refuse to produce, and canonized those who complain ___ Sowell
{फैसला}
फैसला उनको भूल जाने का..
एक नया ख्वाब है दीवाने का..
त्यांच्याच शब्दात, मेहदी हसन साहेबांबद्दल हे म्हणू शकतो
****
निवांत पोपटजी,
बूच न मारल्या बद्दल धन्यवाद.
"To feel superior to other humans, which I often do, I need a better reason than color of my skin." -Archie Goodwin. "or the caste in which i am born" -Iblis
{चूक असेल तर दुरूस्त करायला}
चूक असेल तर दुरूस्त करायला काहीच हरकत नाही. करतो.
धन्यवाद इब्लिस साब,,,,,
..............................................................
क्या फर्क पडता है?
{अत्यंत दु:खद बातमी.. शेवटची}
अत्यंत दु:खद बातमी.. शेवटची तब्बल बारा वर्षं त्यांनी मृत्यूशी झुंज दिली हे वाचण्यात आलं तेव्हा आणखीनच वाईट वाटलं. इतरांच्या आयुष्यात अनेक सुंदर सुरेल संध्याकाळी आणणार्या या व्यक्तीची स्वतःची संध्याकाळ इतकी क्लेशदायक व्हावी हे खूप वाईट..
आदरांजली.
{शायद कभी ख्वाबोंमें मिले....}
देश-विदेश, हे आपले घर-ते परक्याचे, ती आमची-तो दुसर्याचा, तो स्वाद इथला-तो तिथला....आदी अनेक आपलेतुपल्या गोष्टी किती निरर्थक आहेत हे पटवून देण्याची हातोटी असते ती कलाकारांच्यात. जितकी लता आपली तितकी नूरजहानही...जितका साहिर आपला तितकाच मंटो....आणि मग फरीदा खातूम रेश्मा गुलाम अली आदीनी इथल्या मनावर जी काही जादू घालायला सुरुवात केली त्यात रसिक भिजून चिंब झाले.
या सर्वांचे मेरुमणी अर्थातच 'मेहदी हसन'. रसिकच 'दिवाना बनाना है...तो दीवाना बना दे...' असे म्हणत या वेडावणार्या आवाजाच्या आणि त्यातील घनतेकडे धावतच गेले आणि मग मेहदीने आपल्यापरक्याच्या सार्या भिंती तोडून टाकत इथल्याच नव्हे तर जगभर विखुरल्या गेलेल्या गझलप्रेमींच्या मनावर दशकानुदशके राज्य केले....जे त्यांच्या पैगंबरवासी कालानंतरही अबाधित राहील.
आज सकाळी हा धागा वाचतवाचतच बाजूला ऐकत राहिलो :
"अब के हम बिछडे तो शायद कभी ख्वाबोंमें मिले....
जिस तरह सूखे हुये फूल किताबोंमें मिले...."
~ शरीररुपी "...बिछडे" जरूर झालो असू आम्ही मेहदी हसन यांच्याबाबतीत....तरीही आमच्या मनकिताबात त्यांचा आवाज नित्यनेमाने रुंजी घालीत राहील, इतकेच निपोंच्या मेहदीप्रेमापोटी म्हणू शकतो.
अशोक पाटील